जासई हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासईमध्ये स्कूल कमिटी चेअरमन अरुण जगे यांच्या अध्यक्षतेखाली दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कामगार नेते व भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष व कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुरेश पाटील, माजी सभापती नरेश घरत, हायस्कूलचे नुतन प्राचार्य अरुण घाग, उपमुख्याध्यापक खाडे, पर्यवेक्षक साळुंखे, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

विसपुते महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल व बोर्ड ऑफ स्टडीज, शिक्षणशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 12) राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस हा कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉ. मधुकर शेवाले, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, मुंबई विद्यापीठ, ठाणे सब कॅम्पस च्या डायरेक्टर डॉ. सुनिता मगरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे, आणि त्यांचा सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या नंतर ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी एक ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. एमएड्, बीएड्, व बीलिबच्या स्नेहा पाटील व श्रेयस रोडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. सुनिता मगरे, धनराज विसपुते, डॉ. मधुकर शेवाले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सीमा कांबळे यांनी आभार मानले.

रायगड पोलीस दलातील 13 जणांना पदके

अलिबाग : प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा 73 व्या वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम शनिवारी (दि. 15) रायगड पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. या वेळी रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनावरील 8 अधिकारी व पाच पोलीस कर्मचारी अशा 13 जणांना पोलीस दलातील विविध कार्यासाठी पदक प्रदान केली जाणार आहेत.

कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल तुकाराम घेरडीकर, खालापुर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत जगन्नाथ पाटील, पेण उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन केशवराव जाधव, पोयनाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास सुरेश आव्हाड, माणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर शिवाजी कावळे, खोपोली पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक अमोल गंड्यापा वळसंग, कर्जत पोलीस ठाण्यचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मोहन गावडे, वडखळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजितकुमार चंद्रकांत शिंदे, सहायक फौजदार दिवंगत दिपक सिताराम लाड, पोलीस हवालदार मंगेश खंडू पाटील, पोलीस हवालदार राजेश रमेश नाईक, पोलीस हवालदार सुधीर विष्णू मोरे, महिला पोलीस हवालदार सुषमा जयवंत राउळ यांना पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply