पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बासा माशाचे जल अर्पण करून ग्लोबल कोकण, कोकण बिझनेस फोरम प्रकल्पाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 14) करण्यात आला. ग्लोबल कोकणचे प्रमुख पदाधिकारी नरेंद्र बामणे यांच्या पुढाकाराने पनवेल येथील मोरबे धरणात हा प्रकल्प सुरू करण्यात आला.
या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रकाश खैरे, रवींद्र पाटील, बाळाराम उसाटकर, रमेश नावडेकर, रामदास म्हात्रे, राजन एकलहरे, अभिजित पेडणेकर, राजश्री यादवराव, वीरेंद्र बामणे, संतोष सावंत, दिप्तेश जगताप, अविनाश कोळी, संजय धामापूरकर, अनिकेत, सुबोध ठाकूर, कृष्णा व त्यांची टीम, स्थानिक वनवासी कर्मचारी तसेच कोकण बिझनेस फोरमची मत्स्यविभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
कोरोनामुळे जग चिंतेत असताना समृद्ध कोकणासाठी काय करता येईल या विचारातून कोकण बिझनेस फोरमचे अतिशय सकारात्मक व रचनात्मक मिशन सुरू आहे. अनेक धरणे, तलाव, शेततळी कोकणात आहेत. आधुनिक मत्स्यशेतीचे प्रकल्प कोकणात केले तर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.
मत्स्य विभागप्रमुख, मत्स्य क्षेत्रातील नामवंत उद्योजक व तज्ज्ञ राजन एकलहरे यांच्या नेतृत्वात एक स्टार्ट-अप कंपनी कोकण बिझनेस फोरमने सुरू केली. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. अत्याधुनिक तंत्राचा वापर करून कोकणात व्हेनामी, जिताडा, खेकडा, बासा तिलापिया अशा स्वरूपाचे माशांचे उत्पादन, सोबत कोकणातील समुद्रात मिळणारे मासे यांची मुंबई-पुण्यात व जगभरात विक्रीची व्यवस्था अशा स्वरूपाचे अभियान सुरू आहे. त्याची देखणी सुरुवात प्रत्यक्ष धरणावर झाली. देशात मत्स्यविक्रीची साखळी कोकणातील तरुणांच्या मदतीने उभारली जात आहे. जगभरातील तरुण यात सहभागी होत आहेत. ग्लोबल कोकण व कोकण बिझनेस फोरमच्या माध्यमातून कोकणच्या सर्वांगीण विकासाकरिता वाहिलेले पहिले वेब चॅनेल ग्लोबल कोकण सुरू करण्यात येत आहे.
Check Also
रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …