पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढत चालली असून, 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 18) झाली, तर 359 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 389 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण तीन, श्रीवर्धन दोन आणि खालापूर व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल तालुक्यात 176, अलिबाग 38, खालापूर 31, माणगाव 24, पेण 23, महाड 21, उरण 15, कर्जत 12, सुधागड, श्रीवर्धन व पोलादपूर प्रत्येकी पाच, रोहा तीन, म्हसळा एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 21,571 आणि मृतांची संख्या 661 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17,917 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3352 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper