Breaking News

कोरळवाडी आदिवासीवाडीतील प्रश्न मार्गी लागण्याची आशा

पनवेल : वार्ताहर

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वाडीतील रस्ता पाणी आणि शिक्षणाचा प्रश्न कायमचा सुटणार या आशेने कोरलवाडीतील आदिवासींनी आपले पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करून प्रशासनाचे आभार मानले.

गेल्या काही महिन्यापासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर या वाडीला मूलभूत सुविधा पुरवून देण्यासाठी जागतिक आदिवासी दिनापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. याची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रित बैठक घेऊन कोरळवाडीला प्रत्यक्ष स्थळपाहणी भेट करण्याचे सर्व निर्देश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी दिले होते.

ठरवल्याप्रमाणे मंगळवारी (दि. 18) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्यासह महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, पेन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड, पनवेल सोनावणे वनपरिक्षेत्र अधिकारी सोनावणे, नक्षेत्रपाल कांबळे, वन संरक्षक कदम, आनंद खाने, पनवेल पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी लता मोहिते रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कांबळे, राजिप बांधकाम विभागाचे अभियंता संदेश पाटील, पंचायत समिती सदस्या तनुजा टेंभे, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच भोईर पनवेल पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी साबळे, आपटा मंडळ अधिकारी मनीष जोशी, पनवेल तालुका भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी दीपक ढवळे, आपटा तलाठी कविता बाली, कर्नाळा तलाठी बळीराम लाटे, ग्रामपंचायत सदस्य वृषभ धुमाळ, स्थानिक कार्यकर्ते स्वप्नील भोवड, ग्राम संवर्धन संस्थेच्या बालग्राम प्रकलपाचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे येथील अधिकारी यांनी वाडीला भेट दिली. या वेळी कोरळवाडी आदिवासी वाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच अहिरराव यांनी आलेल्या सर्व अधिकारी व पदाधिकार्‍यांना 21 ऑगस्ट रोजी पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांच्या दालनात होणार्‍या आढावा बैठकीत येताना आपापले दस्तावेज सोबत घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. तर वाडीतील सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन गुरुदास वाघे, संतोष पवार, भानुदास पवार हरिश्चंद्र वाघे, लक्ष्मण पवार, बेबी राम वाघे, रमेश वाघे, राम बयाजी वाघे, हरिश्चंद्र वाघे यांच्यासह ग्रामसंवर्धनाचे कार्यकर्ते राजेश रसाळ, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत व कोरलवाडी ग्रामस्थानी उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी साबळे यांनी आनंद व्यक्त केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आधारकार्ड आणि आरोग्य विमा शिबिराचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमध्ये आधारकार्ड शिबिर आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचे 15 …

Leave a Reply