Breaking News

अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशन देणार सेवा

कोरोना रुग्णांच्या नि:शुल्क सेवेसाठी डॉक्टर सरसावले

मुरूड : प्रतिनिधी – येथील डॉ. मयूर कल्याणी व त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील इतर सहकारी तसेच अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनमधील काही डॉक्टर्स अलिबाग व मुरूड या दोन तालुक्यांतील होम क्वारंटाइन व आयसोलेशनमधील कोरोना रुग्णांचे दैनंदिन अहवाल तपासणी व मार्गदर्शन करण्यासाठी नि:शुल्क सेवा देणार आहेत.

होम आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या देखभालीविषयी जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनाला अलिबाग-मुरूड मेडिकल असोसिएशनने प्रतिसाद दिला आहे. सेवाकार्यासाठी स्वच्छेने काम करू इच्छिणार्‍या डॉक्टरांची गाव व आरोग्य केंद्रनिहाय यादी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. सर्व डॉक्टर्स ही सेवा निशुल्क देणार आहेत.

दरम्यान, मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांना कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल असोसिएशनकडून कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले. या वेळी अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी, माजी अध्यक्ष डॉ. रवी म्हात्रे, उपाध्यक्ष डॉ. गणेश गवळी, डॉ. संजय पाटील, सचिव डॉ. राजाराम हुलवन, डॉ. निशिगंध आठवले, डॉ. अमित बेनकर, डॉ. कर्वेकर, डॉ. वसीम पेशमाम आदी उपस्थित होते.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply