Breaking News

भाजपकडून मदतीचा ओघ सुरूच; पनवेल परिसरातील गावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिघाटी, करंजाडे, कळंबोली, तळोजा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गरिबांना यंदाच्या गणेशोत्सवामध्ये फराळ, प्रसाद करता यावा या हेतूने मैदा, साखर, चनाडाळ, रवा, डाळडा, गुळ अशा पदार्थांचे वाटप केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply