पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 27) 454 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे 441 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 263, पेण 36, अलिबाग 33, खालापूर 29, माणगाव 26, रोहा व महाड प्रत्येकी 16, उरण 14, कर्जत 10, पोलादपूर चार, मुरूड तीन आणि सुधागड व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात पाच, खालापूर तीन, महाड दोन आणि उरण, सुधागड व पोलादपूर तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 25,600 व मृतांची संख्या 768 झाली आहे. जिल्ह्यात 21,791 जण कोरोनामुक्त झाल्याने 3041 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper