पनवेल : रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस कोरोना रुग्णांचे नवे उच्चांक प्रस्थापित झाल्यानंतर सोमवारी (दि. 7) काहीसा दिलासा मिळून 531 नव्या कोरोना रुग्णांची आणि सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दुसरीकडे दिवसभरात 408 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 279, अलिबाग 101, पेण 47, खालापूर 25, रोहा 18, सुधागड 14, माणगाव 13, उरण व कर्जत प्रत्येकी 11, महाड नऊ, पोलादपूर दोन आणि मुरूडमधील एकाचा समावेश आहे; तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात दोन आणि पेण, मुरूड, तळा व सुधागड येथे प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 32,123 व मृतांची संख्या 903 झाली आहे. जिल्ह्यात 26,101 जण कोरोनामुक्त झाल्याने 5119 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper