Breaking News

पनवेल मनपा मुख्यालय उभारणी प्रक्रियेला वेग

वास्तुविशारद, सल्लागार कंपनीच्या नियुक्तीला स्थायी समितीची मंजुरी

खारघर : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेच्या मुख्यालय उभारणीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. बुधवारी (दि. 9) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मनपा मुख्यालयाचे बांधकाम व सर्व आराखडे तसेच अंदाज प्रक्रियेचे काम पाहण्यासाठी मे हितेन सेथी अ‍ॅण्ड असोसिएट्स या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

पनवेल मनपाच्या स्थायी समितीची सभा सभापती प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फडके नाट्यगृहात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली. या सभेत तीन कोटी 47 लाख रुपयांच्या आर्थिक बोलीला मान्यता देण्यात आली. महापालिकेचे स्वराज्य नामक मुख्यालय नवीन पनवेल सेक्टर 16 येथील भूखंड क्रमांक 4वर उभारण्यात येणार आहे. याकरिता सिडकोकडून भूखंड घेण्यात आला असून, सिडकोला सुमारे 28 कोटी रुपये पालिकेच्या माध्यमातून अदा करण्यात आले आहेत. वास्तुविशारद व सल्लागाराची नेमणूक केल्यानंतर मुख्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्याच्या घडीला मनपाचे मुख्यालय हे देवाळे तलावासमोरील नगर परिषदेची जुनी इमारत व त्याच्या बाजूला असलेली आणखी एक इमारत जोडून तयार करण्यात आले आहे. महापालिकेचा पुढील विचार करून शहरासाठी सीडीपी (व्हिजन डॉक्युमेंट) तयार करण्यात आला आहे. याकरिता क्रिसिल रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लि. या कंपनीला काम देण्यात आले आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या बाबी या सीडीपीमध्ये समाविष्ट असणार आहे. म्हणूनच या आराखड्याला व्हिजन डॉक्युमेंट असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय मनपा क्षेत्रातील विविध रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्र, सर्व्हेचे काम पाहणारे शिक्षक आदींचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी ट्रिपल लेयर मास्क खरेदीला स्थायी सभेत परवानगी देण्यात आली. 50 हजार मास्क खरेदीसाठी चार लाख 20 हजारांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाने मृत्युमुखी पावल्यास रुग्णाच्या अंत्यविधीसाठी येणार खर्च मनपाच्या माध्यमातून खर्च करण्यासदेखील या वेळी मंजुरी देण्यात आली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply