पनवेल ः रायगड जिल्ह्यात 20 कोरोना बळींची आणि 757 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी
(दि. 10) झाली, तर दिवसभरात 523 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील सात, रोहा चार, खालापूर तीन, उरण व अलिबाग प्रत्येकी दोन आणि कर्जत व पेण तालुक्यातील एकाचा समावेश आहे; तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 341, अलिबाग 104, पेण 67, रोहा 58, माणगाव 37, कर्जत 34, खालापूर 32, मुरूड 23, उरण 21, पोलादपूर 17, महाड आठ, सुधागड सात आणि श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी चौघे असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 34,620 व मृतांची संख्या 949 झाली आहे. जिल्ह्यात 27,573 जण कोरोनामुक्त झाल्याने 6098 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper