Breaking News

वाशीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नवी मुंबई : बातमीदार – वाशी सेक्टर सेक्टर 3, 4, 6, 7 व 8 मध्ये महत्त्वाच्या मार्गांवर नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. भाजप स्थानिक माजी नगरसेविका विद्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांच्या माध्यमातून हे कॅमेरे लावण्यात आले. त्यामुळे वाशीसारखा नवी मुंबईतील महत्वाचा भाग सुरक्षित झाला आहे.

माजी नगरसेविका दिव्या गायकवाड या गेली पाच वर्षे पालिकेकडे प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे लाववते म्हणून पाठपुरावा करत होत्या. मात्र पालिकेकडे त्यांना कोणतीही दाद दिली गेली नाही. अखेर त्यांनी बीपीसीएल कंपनीकडे प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सीएसआर फंड द्यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार कंपनीने स्वतःच्या माध्यमातून नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावून दिले. त्यानुसार सेक्टर 3 व 4 येथील संभाजी महाराज चौक, सेक्टर 7 व 8 येथील चर्च, आयप्पा चौक/ हुसेन बाग, सेक्टर 6 व 7 येथील भुयारी मार्ग, आरसीएफ रो हाऊसेस, एमटीएनएल कंपनी येथे हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

या सेक्टर्समध्ये खाडी भाग असल्याने मुंबईतून अनेक नागरिक येत असतात, त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेराद्वारे या प्रभागावर लक्ष राहणार असून प्रभाग आधीक सुरक्षित झाला आहे. वाशी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या हस्ते या कमेर्‍यांचे उद्घाटन करण्यात आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply