Breaking News

श्रीवर्धन बाजारपेठेत जत्रेसारखी गर्दी

सामाजिक अंतराच्या नियमाची होते पायमल्ली

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

राज्य शासनाने संपूर्ण राज्यभर कडक निर्बंध लावून लॉकडाउन जाहीर केला आहे. फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा, भाजी, चिकन, मटण, मच्छी इत्यादी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. दिवसभर फक्त औषधांची दुकाने, रुग्णालये व दवाखाने इत्यादी आस्थापना उघडे ठेवण्यास परवानगी आहे, मात्र श्रीवर्धन बाजारपेठेत सकाळी 8 वाजल्यानंतर 11 वाजेपर्यंत एखाद्या गावाची जत्रा भरल्याप्रमाणे गर्दी झाल्याचे पाहायला मिळते.

काही नागरिक तोंडाला मास्क लावतात, तर काहींचा मास्क लावलेला असला तरी तो हनुवटीवर असतो. काही विनामास्कदेखील फिरताना आढळून येतात. मागील पाच-सहा दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्यामध्ये खूप मोठा प्रमाणात घट झालेली आहे. अनेक पेशंट बरे होऊन कोरोनामुक्तदेखील झाले आहेत, परंतु नागरिकांना मुभा दिली आहे म्हणून विनाकारण बाजारात यायचे, गर्दी करायची तेवढाच उद्योग असल्याचे

दिसून येते.

प्रशासनाकडून घरपोच सेवा मिळण्यासाठी काही दुकानदारांची नावे, दूध पुरवठा करणार्‍याची नावे जाहीर करण्यात आली आहेत, पण नागरिक घरपोच सेवेचा लाभ न घेता घरातून बाहेर पडून वस्तू खरेदी करून आणत आहेत. सकाळी 11 वाजल्यानंतर पोलीस बाजारपेठेत फिरत असल्याने दुकाने तत्काळ बंद केली जातात व काही वेळातच पूर्ण बाजारपेठ निर्मनुष्य झालेलीदेखील पाहायला मिळते.

बाजारपेठेत खरेदीसाठी आल्यानंतर सामाजिक अंतराचे भान कोणालाही राहिलेले नसते. त्यामुळे प्रशासनाने गर्दीच्या वेळी ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना वेळोवेळी सूचना द्याव्या व गर्दी टाळण्याचे आवाहन करावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply