पनवेल ः रामप्रहर वत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन रसायनी विभागातील शेकापचे युवा नेते सतिश लक्ष्मण ठाकूर, अतिष लक्ष्मण ठाकूर, नितीश लक्ष्मण ठाकूर तसेच रोहित यशवंत पाठारे यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शनिवारी (दि. 19) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन युवा कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आला. तुराडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष प्रतिक भोईर यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश झाला.
या कार्यक्रमास नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, संतोष माळी, कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मिरकुटे, विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, सुनील माळी, तुराडे ग्रामपंचयतीचे उपसरपंच हरिष पाठारे, जिल्हा परिषद विभागीय उपाध्यक्ष प्रतिक भोईर, प्रफुल्ल पाठारे, योगेश मुरकुटे, प्रितेश गायकर, देवेंद्र भोईर, भावेश रसाळ आदी उपस्थित होते.
सतिश, अतिष व नितीश हे पनवेल पंचायत समितीच्या माजी सभापती निशा ठाकूर यांचे सुपुत्र आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रश्नाकडे शेकापच्या नेत्यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. स्वार्थासाठी शेकापच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांचा वापर केला.
या मतलबी कारभाराला कार्यकर्ते पुरते कंटाळले आहेत. त्यामुळे शेकापला मोठ्या प्रमाणात घरघर लागली आहे. या प्रवेशामुळे रसायनी विभागात शेकापला मोठा धक्का बसला आहे.
Check Also
गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …
RamPrahar – The Panvel Daily Paper