पनवेल ः बातमीदार
भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्टोबर रोजी पनवेल तालुक्यात विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती अभियान या विषयावर चित्ररथ फिरवून स्वयंसिद्धा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. या वेळी या कार्यक्रमास मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी यासह अन्य मान्यवर व बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता. सदर पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी करीत असून कलाकार म्हणून प्रतिक कोळी, प्रतिक पाटील, विनोद नाईक, सौरभ मोरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, स्वप्नाली थळे आदी कलाकार सहभागी झाले असून सदर कार्यक्रम उत्कृष्टरीत्या झाला.