Breaking News

पोलीस कर्मचार्यांची अँटिजेन चाचणी

कळंबोली ः प्रतिनिधी 

कोरोनाच्या महामारीत आपल्या सहकारी बंधू-भगिनींच्या जीवाचे संरक्षण करताना कळंबोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या प्रयत्नातून मंगळवारी (दि. 29) सर्व कर्मचार्‍यांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांकडून कुटुंबप्रमुख सतीश गायकवाड यांच्याबद्दल आदर व्यक्त होत आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता कोणत्याही सहकार्‍याला त्रास होऊ नये म्हणून मंगळवारी पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांच्या आरोग्याचे दृष्टीने कळंबोली पोलीस ठाणे आवारात प्राथमिक आरोग्य केंद्र, कळंबोली मोबाइल टीमच्या सहकार्याने कोविडच्या अनुषंगाने अँटिजेन टेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आठ  अधिकारी व 68 कर्मचार्‍यांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेली औषधे, कीट व मार्गदर्शनामुळे पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत झाली. त्यामुळेच सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांचे अँटिजेन टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply