Breaking News

आज लाभार्थींना मिळणार जयपूर फूट

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत जयपूर फूट कॅम्पमधील लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत.  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील सभागृहात सकाळी 9 वाजता होणार्‍या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, साधू वासवानी मिशनचे वैद्यकीय तज्ज्ञ यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply