Breaking News

धरमतर खाडीचा संयुक्त पाहणी दौरा

पेण ः प्रतिनिधी
धरमतर खाडीतील मच्छीमारांवरील अन्याय, नुकसानभरपाई व पुनर्वसन अशा अनेक मागण्यांसंदर्भात पेण व अलिबाग तालुक्यातील धरमतर खाडीच्या किनारपट्टीवर असलेल्या 47 गावांतील रहिवाशांच्या मागणीमुळे 21 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार डॉ. विवेक वर्तक, शास्त्रज्ञ खारजमीन संशोधन केंद्र, पनवेल यांच्या अध्यक्षतेखाली धरमतर खाडी व कोकणातील इतर खाड्ड्यांत मत्स्यव्यवसाय व प्रदूषणविषयक अभ्यासासाठी समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या वतीने बुधवारी
(दि. 30) धरमतर खाडीची संयुक्त पाहणी करण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक वर्तक, आमदार प्रशांत ठाकूर, पूनम खंडागळे, तहसीलदार सुनील जाधव, मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश भारती, पांडुरंग म्हात्रे, धर्मा पाटील, उल्हास वाटकरे, धरमतर पोर्ट ऑफिसचे इन्स्पेक्टर प्रवीण पाटील, चेतन निवळकर आदी उपस्थित होते.
धरमतर पोर्ट ऑफिस येथे मच्छीमार संघटनेचे चेअरमन यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर कासूमाता प्रसन्न बोटीने समुद्रात जाऊन शासनाने समितीस दिलेल्या गाइडलाइननुसार धरमतर खाडीतील जेट्ट्यांमुळे मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन कायमचे नष्ट झाल्यामुळे त्यांची पाहणी करण्यात आली.  या वेळी प्रथम पी. एन. पी. कंपनी जेट्टी, जे. एस. डब्ल्यू कंपनीच्या जेट्ट्यांची पाहणी केली. त्यानंतर धरमतर ते घोडबंदरपर्यंतचा प्रवास करून क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यांची व मांडा यांची पाहणी केली. तसेच 135च्या पट्ट्यातील बार्जेस मार्गाची पाहणी केली. धरमतर खाडीत प्रत्यक्ष मासेमारी करणार्‍या पेण व अलिबाग तालुक्यातील मच्छीमारांची भेट या वेळी घेण्यात आली.
त्यानंतर घोडबंदर येथून समिती पुन्हा धरमतर बंदराकडे येऊन पाहणी पूर्ण झाल्याने पांडुरंग म्हात्रे यांनी सर्व संबंधितांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच अमोल पाटील यांची बोट या कामासाठी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या समितीचा अभ्यास दौरा पाहण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी सर्व मच्छीमार संघटनांचे चेअरमन मोहन शिंदे, रंजीत कोळी, रामचंद्र भोईर, दत्ता पाटील, विलास कोळी, विनायक पाटील, रूपेश पाटील, संदीप ठाकूर, भास्कर पाटील, प्रदीप पाटील, तुकाराम म्हात्रे, प्रदीप पाटील या सर्वांचे पांडुरंग म्हात्रे यांनी आभार मानून धरमतर खाडीची संयुक्तीक पाहणी पूर्ण झाली. या वेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अनंत पाटील, अमित पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply