अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबाग येथील बँक ऑफ बडोदा शाखेच्या वतीने वित्तीय साक्षरता आणि वित्तीय समावेशन शिबिर नुकतेच वाडगाव आदिवासीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या वेळी प्रधानमंत्री सुरक्षा विम्याची दोन लाखांची इन्शुरन्स पॉलिसी 250 आदिवासी बांधवांसाठी कार्यक्रमस्थळी विनाअट उघडण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नाबार्ड जिल्हा संचालक सुधाकर रगतवर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमात बँक आँफ बडोदा अलिबाग शाखेचे शाखा प्रबंधक पुल्ला हरी बाबू यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सोशल सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना या केंद्र शासनाच्या योजनांचे उपस्थितांना महत्त्व पटवून दिले. बिझनेस असोसिएट संदीप माने आणि बँक मित्र तेजस म्हात्रे व बँकेच्या सर्व कर्मचार्यांनी आदिवासी महिला व पुरुषांचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसह प्रधानमंत्री जनधन योजना या योजनेसोबत प्रधानमंत्री सुरक्षा विम्याची दोन लाखांची इन्शुरन्स पॉलिसी 250 आदिवासी बांधवांसाठी कार्यक्रमस्थळी विनाअट उघडून दिली. या वेळी वाडगाव ग्रामपंचायत सरपंच सरिता भगत, उपसरपंच प्रसाद पाटील यांच्यासह सदस्य जयेंद्र भगत, सजना नाईक, नीलम थळे, प्रमिला कुले, शुभांगी भगत, अंजली भगत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी
आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …
RamPrahar – The Panvel Daily Paper