Breaking News

रायगडात ग्रामपंचायतींचा रणसंग्राम; 87 ठिकाणी डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याच्या हालचाली

अलिबाग ः प्रतिनिधी

जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात घेण्याच्या द़ृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये कोविड-19ची परिस्थिती काय आहे याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने मागविली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनदेखील या रणसंग्रामाच्या तयारीला लागले आहे. जुलै महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक मे किंवा जून महिन्यात होणे अपेक्षित होते, परंतु कोरोना या जागतिक महामारीमुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. तेथे सध्या प्रशासक आहे. आता ऑक्टोबर महिना संपत आला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याची तयारी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

जुलै ते डिसेंबर या कालावधीत अलिबाग तालुक्यातील चार, पेण सात, पनवेल 24, उरण सहा, कर्जत नऊ, रोहा 20, माणगाव व महाड प्रत्येकी पाच, श्रीवर्धन चार, म्हसळा तीन अशा एकूण 87 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. तेथील कोविड-19ची परिस्थिती काय आहे याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलिबाग-मान तर्फे झिराड, सासवणे, पेझारी, वाघोडे; पेण-काळेश्री, बोर्झे, वाकरूळ, खारपाले, कामार्ली, आंबेघर, जोहे; पनवेल-बारवई, साई, सावळे, खानाव, वलप, आकुर्ली, हरिग्राम, खैरवाडी, नानोशी, पोसरी, खानावले, उमरोली, आपटा, पाली देवद, कोळखे, सांगुर्ली, मोर्बे, उसर्ली खुर्द, पाले बुद्रूक, देवळोली, केवाळे, वाकडी, वाजेे, वारदोली; उरण-चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, फुंडे, वेश्वी; कर्जत-कोल्हारे, जिते, पोशीर, साळोख तर्फे वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, दामत; रोहा-रोठ बुद्रूक, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, धामणसई, मालसई, महाळूंगे, शेडसई, तिसे, वरसे, वरवटणे, खांब, पळस, कोंडगाव, ऐनघर, चिंचवली तर्फे दिवाळी, वाशी, वावेपोटगे, गोवे; माणगाव-बामणोली, देवळी, लोणेरे, लाखपाले, टेमपाले; महाड-नरवण, भेलोशी, मांडले, आसनपोई, बिरवाडी; श्रीवर्धन- कोलमांडले, कारिवणे, गालसुरे, दिघी; म्हसळा-पाभरे, केलटे, लिपणी वावे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply