Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाचे उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमी. या दिवशी चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार पनवेलमधील सीनिअर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी आपल्या नूतन हंगामाची सुरुवात केली. पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्रीफळ वाढवून आणि नंतर चौफेर फटकेबाजी करीत सीनिअर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाची सुरुवात केली. या वेळी क्लबच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे फुलांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

समाजातील विविध स्तरांतील ज्येष्ठ खेळाडू एकत्र येत एचओसी कॉलनी येथील तालुका क्रीडा केंद्राच्या मैदानावर सराव करीत असतात. या उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सीनिअर क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना खेळाच्या यशस्वी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नगरसेवक नितीन पाटील, डॉ. ययाती गांधी, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, डॉ. नितीन पोवळे, डॉ. रवींद्र राऊत, उद्योजक संजय पाटकर, ए. के. म्हात्रे, अ‍ॅड. वाडकर, संकेत पवळ, सागर ठाकूर, कर्णधार प्रदीप पाटील, उपकर्णधार सुभाष पाटील, प्रफुल्ल पेंडसे, अप्पू कुंभार, विजय पाटील, रवी घाडगे, केदार माने, सागर अटवणे, त्रिशूल म्हात्रे, सुहास देशमुख, पाटेकर आदी संघ सदस्य उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply