Breaking News

खांदा कॉलनीतील समस्यांबाबत सिडको प्रशासनासोबत बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, फूटपाथ, उद्यान, लाईट या सारख्या विविध समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यापार्श्वभुमीवर खांदा कॉलनीमधील नगरसेवकांनी सिडकोचे अधिक्षक अभियंता एस. जी. रोकडे यांच्यासोबत गुरुवारी (दि. 29) बैठकीचे आयोजन ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्या संदर्भात चर्चा केली.

नवीन पनवेल येथील सिडकोच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ चे सभापती समीर ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संजय भोपी, नगरसेविका सिता पाटील, भाजप नेते भिमराव पोवार, गोपीनाथ मुंडे, शांताराम महाडीक, सचिन मोटे उपस्थित होते. या संदर्भात नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि नगरसेविका सीताताई पाटील यांनी अधिक महिती दिली.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply