Breaking News

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी आजाराचं संकट मात्र कायम आहे. पुढील काही दिवसांत करोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही केंद्र सरकारच्या समितीने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकार सावधगिरीने पावले उचलताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून, ‘मिशन बिगिन अगेन’तंर्गत सुरू केलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये मुंबईतील लोकल सेवेसह राज्यातंर्गत रेल्वे सुरू करण्यास परवानगी देत लॉकडाऊन 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवला होता. आता ऑक्टोबरमध्ये त्यांची मुदत संपल्याने पुन्हा एकदा 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. लॉकडाऊनची मुदत वाढवताना मिशन बिगिन अंतर्गत परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील असे सरकारने म्हटले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply