Breaking News

रेवदंड्यात भटक्या कुत्र्यांमुळे मॉर्निंगवॉक करणार्‍यांमध्ये भिती

रेवदंडा : प्रतिनिधी

थंडीच्या चाहूल लागताच, मॉर्निगवॉकवाल्यांनी सुध्दा रेवदंडा समुद्र किनारी गर्दी होऊ लागली आहे, परंतू समुद्र किनारी भटक्या कुत्री मोठ्या प्रमाणात असून त्याचा वाढता उपद्रव मॉर्निंगवॉकसाठी येणार्‍यांसाठी भितीचा ठरतो आहे.

रेवदंडा समुद्र किनारी भटक्या कुत्रांचा मोठा ससेमिरा सुरू आहे, अनेक भटकी कुत्री समुद्र किनारी गर्दीने फिरत आहेत, सकाळी मॉर्निगवॉक साठी निघालेल्यांना मात्र या भटक्या कुत्रांच्या उपस्थितीने भितीने वातावरण निर्माण होते. ही भटकी कुत्री एकत्रीतपणे गॅगने फिरत असल्याने एकटयाने समुद्र किनारी चालताना चांगलीच भंबेरी उडते त्यामुळे समुद्र किनारी मॉर्निगवॉकसाठी हातात काठी घेऊनच यावे लागते.

रेवदंडा समुद्र किनारी वाळूत थोडया अंतरावर ही भटकी दहा, बारा कुत्री एकत्रीत फिरत असतात, एकूणच दोन तिन किमी अंतरामध्ये या भटक्या कुत्रांच्या सात आठ गॅग समुद्र किनारी फिरत असतात. काही वेळी ही कुत्री येथून मॉर्निगवॉकसाठी फिरत असलेल्यांच्या अंगावर धावून जातात, त्यामुळे एकटयाने मॉर्निगवॉकसाठी समुद्रकिनारी निघणे धोकेदायक ठरत आहे. मॉर्निगवॉकच्या निमित्ताने मोठया संख्येने महिलावर्ग सुध्दा समुद्र किनारी येत असतो, या भटक्या कुत्रांच्या एकत्रीत फिरण्याने त्यांना सुध्दा भितीने जा-ये करावी लागते.  

संबधीताना रेवदंडा समुद्र किनारी या भटक्या कुत्रांच्या त्रासापासून विशेषतः मार्निगवॉकसाठी जाणार्याच्या सुविधेसाठी काहीतरी बदोबस्त करावा अशी चर्चा होत आहे.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply