Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत गव्हाण विद्यालयाचे विद्यार्थी चमकले

गव्हाण : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश प्राप्त केले. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दीक्षा वर्तक ही विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक ठरली असून ती जिल्ह्यात पहिल्या 10 मध्ये मानांकित झाली आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पाच पात्र झालेले त्यापैकी एक विद्यार्थिनी शिष्यवृत्ती धारक ठरली आहे. दिक्षा रमेश वर्तक हिला पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 288 पैकी 212 गुण मिळवून ती रायगड जिल्ह्यात ग्रामीण विद्यार्थ्यांत पहिल्या 10 विद्यार्थ्यांत येऊन राष्ट्रीय ग्रामीण (ए -10/10)गटात तिची निवड झाली आहे

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सहा विद्यार्थी पात्र झालेले असून त्या सहा पैकी चार विद्यार्थ्यी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. ह्या चारही विद्यार्थ्यांची ग्रामीण सर्वसाधारण यादीत निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे, शुभम अलदार 184-(62.59) गुण मिळवून ग-18/173, प्रतिकेश मुरकुटे176-(59.86) गुण मिळवून ग-30/173, आकाश गुंजाळकर 168-(57.14) गुण मिळवून ग-57/173, शशिकांत चौगुले 168 गुण (57.14)

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी तसेच विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक तथा प्रभारी प्राचार्य राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दिपक भर्णूके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी, लाइफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर आदींनी यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply