Breaking News

खारघरमध्ये आज कर्करोग जागरूकता चर्चासत्र

पनवेल : कर्करोगाविषयी लोकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या वतीने खारघरमध्ये बुधवारी (दि. 3) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा नायर मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

1 ते 7 एप्रिल हा आठवडा तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींसाठी कर्करोग जागरूकता सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. या सप्ताहानिमित्त धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेतर्फे खारघर सेक्टर 4 मधील  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये सायंकाळी 4 वाजता कर्करोगाविषयी लोकांत जागरूता करण्यासाठी चर्चासत्र घेण्यात येत आहे. या चर्चासत्रात एशियन कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. निशा नायर या कर्करोगाविषयी माहिती देऊन त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्राला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply