Breaking News

पनवेल महानगरपालिकेकडून विविध विकासकामांचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू असून, ती प्रगतिपथावर आहे. यापैकी प्रभाग अ, ब आणि ड मधील कामांची महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आणि सहकार्‍यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या दौर्‍यात स्मार्ट व्हिलेज अंतर्गत येणारे रोडपाली गाव तसेच आयुक्त निवास, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण, महात्मा गांधी उद्यान, वडाळे तलाव आणि प्रभाग ड मधील रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौर्‍यात महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापींसह प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, सुशिला घरत, नगरसेवक मनोज भुजबळ, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका चारुशीला घरत, प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, वृषाली वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply