अलिबाग : प्रतिनिधी – सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या देशामध्ये शासनाचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. देशात सर्व व्यवहार ठप्प आहेत. या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये नियम शिथील करण्यात आलेले आहेत. लॉकडाऊन काळात अडकेलेल्या नागरिकांना त्यांच्या मुळ गावी परतण्यासाठी सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेत अलिबागमध्ये भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांच्या सौजन्याने खारपाडा-अलिबाग-मुरूड विनामूल्य बससेवा देण्यात आलेली आहे.
या वेळी महेश मोहिते यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, तर खारपाडा येथे भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील हजर होते. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या विनामूल्य बसेसेवेचा नागरिक लाभ घेत असून, आभार व्यक्त करीत आहेत.