ठाणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 84व्या वर्षी ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य व सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
पटवर्धन यांनी गेली पन्नास वर्षे मराठी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले. दूरदर्शनवरच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात प्रसारित झालेल्या आणि अमाप लोकप्रियता मिळालेल्या ‘गप्पागोष्टी’मुळे पटवर्धन यांचा चेहरा घराघरांतला पोहोचला. यातील त्यांनी साकारलेले ‘वस्ताद पाटील’ प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहतील. अग्गंबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत त्यांनी बबड्याचे आजोबा ही भूमिका साकारली.
Check Also
न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper