Breaking News

जनहिताच्या कामांना भाजपचे प्राधान्य -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलच्या शिवकर येथे विकासकामांचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जी कामे करायची ती जनतेसाठी आणि त्यांना समाधान मिळवून देण्यासाठी करायची, अशी भावना भारतीय जनता पक्षाची आहे. अशाच प्रकारे जनहिताच्या कामांना प्राधान्य देत पक्ष काम करीत आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवकर येथे केले.
पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायत हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण गुरुवारी (दि.३०) त्यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात राजिप प्राथमिक शाळेच्या नवीन चार वर्गखोल्यांचे लोकार्पण करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे तसेच अंगणवाडी क्रमांक २ आणि ३च्या नवीन इमारतींचेही उद्घाटन करण्यात आले, ज्याद्वारे बालशिक्षण आणि आरोग्याला चालना मिळणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना गणेवश वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीचेसुद्धा लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, सदस्य राजेंद्र पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, एकनाथ देशेकर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरपंच आनंद ढवळे, उपसरपंच मंगेश ढवळे, ग्रामपंचायत सदस्य प्रांजळ पाटील, रितू पाटील, मोनिका पोपट, संतोष मते, मनीषा ढवळे, सुरेखा टोपले, रवींद्र ढवळे, रेश्मा पाटील, बीडीओ समीर वाठारकर, अभिजीत मटकर, गटशिक्षणाधिकारी शाहू सपकाळ, एन.के. गीते, मयूर शेळके, श्री गणपती देवस्थानचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सदस्य चंद्रकांत ढवळे, पोलीस पाटील मिलिंद पोपेटा, भास्कर पाटील, माया पाटील, लक्ष्मण कांबळे, दत्तात्रेय ढवळे, शालिक पाटील, भरत टोपले, नामदेव तुपे, दत्तात्रेय पाटील, बबन ढवळे, गोटीराम ढवळे, तुकाराम टोपले, तुकाराम पाटील, वामन ढवळे, हरिश्चंद्र ढवळे, चंद्रकांत ढवळे, पुंडलिक ढवळे, तुकाराम ढवळे, त्रिंबक ढवळे, अरुण पाटील, वसंत ढवळे, धुळजी भोईर, जगदीश पोपेटा, भरत चौधरी, रोशन तुपे, अरविंद माळी, सागर ढवळे, पराग ढवळे, अक्षय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत असून येणारी पिढी ही अधिक सुशिक्षित आणि सक्षम होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

Check Also

नैना विकासाला मोठी चालना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती

शेतकऱ्यांच्या हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई ः रामप्रहर वृत्तनैना (नवी मुंबई एअरपोर्ट इंफ्लूएन्स नोटीफाईड एरिया) विकासाला …

Leave a Reply