‘रोटरी’च्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर

पनवेल : वार्ताहर – रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदी पनवेलमधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ, भंडारकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. जय भंडारकर यांची निवड झाली आहे.

 सन 2023-2024 च्या अध्यक्षपदासाठी डॉ. जय भंडारकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पीपी प्रमोद वालेकर यांनी डॉ. जय भंडारकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आयपीपी डॉ. प्रकाश पाटील, पीपी डॉ. प्रमोद गांधी, पीपी अलीअसगर व्होरा आणि पीपी सुधीर कांडपिळे यांनी चेअरमन पीपी प्रमोद वालेकर यांना बहुमोल सहकार्य केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या सन 2023-24च्या अध्यक्षपदी डॉ. जय भंडारकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल विद्यमान अध्यक्ष हार्मेश तन्ना, सेक्रेटरी कल्पेश परमार, प्रकाश श्रुंगारपुरे, राजेंद्र ठाकरे, डॉ. प्रमोद गांधी, चारूदत्त भगत, दिपक जांभेकर, जितेंद्र बालड, डॉ. साधना गांधी, ध्वनी तन्ना, शुभदा भगत, वैशाली ठाकरे आदिंनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply