Breaking News

रायगडातही नाइट कर्फ्यू

अलिबाग : पर्यटकांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल, रेस्टोरंट व रिसोर्ट्सवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या रविवारी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला जाणार असून, पुरातत्त्व विभागाशी चर्चेनंतर किल्ला पुन्हा उघडण्याबाबत निर्णय होणार आहे.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply