
पनवेल : रामप्रहर वृत्त
मालमत्ता करविषयक नागरिकांच्या समस्यांसंदर्भात पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी रहिवाशांना असलेल्या शंकांचे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी निरसन केले तसेच मालमत्ता कर कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
या बैठकीस भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, के. के. म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, पुष्पा कुत्तरवडे, भाजप पदाधिकारी रवी गोवारी, भाऊ भगत, आर. जी. म्हात्रे, प्रदीप भगत, हर्षवर्धन पाटील, रमेश तुपे, प्रशांत कदम, राजेश गायकर, सुशील शर्मा, तेजस जाधव, भास्कर दांडेकर, नवनाथ भोसले, संतोष म्हात्रे, जयश्री धापटे, मालमत्ता करप्रमुख सुनील मानकामे, सल्लागार स्थापत्य कंपन्यांचे प्रतिनिधी, रहिवासी उपस्थित होते.