अलिबाग : पर्यटकांची वाढती संख्या आणि कोरोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्या हॉटेल, रेस्टोरंट व रिसोर्ट्सवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. येत्या रविवारी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला जाणार असून, पुरातत्त्व विभागाशी चर्चेनंतर किल्ला पुन्हा उघडण्याबाबत निर्णय होणार आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …