अहमदाबाद ः वृत्तसंस्था
आयपीएलमध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. 2022च्या हंगामात आयपीएलचे एकूण 10 संघ असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) गुरुवारी (दि. 24) अहमदाबाद येथे झालेल्या 89व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय कोरोना महामारीत सामने न होऊ शकल्यामुळे प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष) योग्य तो मोबदला देण्यावर बैठकीत एकमत झाले तसेच 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper