जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसदेत ‘सीकेटी’ची छाप; पौर्णिमा गायकवाडची राज्यपातळीवर निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात येणार्‍या ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव-2021’ साठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल, खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) येथील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका पौर्णिमा गायकवाड (द्वितीय वर्ष-कला शाखा)ची जिल्हास्तरीय स्पर्धेमधून निवड झाली आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील 60 विद्यार्थ्यांमधून तिची निवड झाली आहे. जिल्हास्तर युवा संसद मध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्यासाठी 4 मिनिटाचा वेळ दिला गेला. स्पर्धेसाठी सुचविलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करत असताना हे धोरण भारतीय शिक्षणाचे परिवर्तन करेल असे गायकवाड हिने सांगितले. त्यासाठी तिची जिल्हास्तरीय निवड होऊन तिने राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यानी प्रशस्तीपत्र देऊन कौतुक केले. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, प्रा. सागर खैरनार व महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. योजना मुनीव यांनी विशेष परिश्रम घेतले. पौर्णिमा गायकवाडला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, भूगोल विभागप्रमुख डॉ. दिपक नारखेडे, परीक्षा नियंत्रक डॉ. सुभाष उन्हाळे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविद्यालयाने दिलेल्या या संधीबद्दल आभार आणि आई-वडिलांच्या दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. -पौर्णिमा गायकवाड, विद्यार्थिनी

Check Also

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало

Как использовать аналитические функции на 1xbet зеркало Аналитические функции на платформе 1xbet зеркало предоставляют пользователям …

Leave a Reply