Breaking News

सुधागडमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव

तालुक्यात सहा सक्रिय रुग्ण, प्रशासन अलर्ट

पाली : प्रतिनिधी

 सुधागड तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र गुरुवारी (दि. 7) चार व शनिवारी (दि. 9) कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे.

तालुक्यात सध्या कोरोनाचे सहा सक्रिय रुग्ण आहेत. आणि ते गृह विलगिकरणमध्ये उपचार घेत आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी प्रशासन पुन्हा अलर्ट झाले आहे.

सुधागड तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 448 रुग्ण सापडले असून त्यापैकी 416 रुग्ण बरे झाले आहेत. 26 रुग्णांचा मृत्यू झाला असून सहा रूग्ण विलगिकरणमध्ये उपचार घेत आहेत. नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी.

-डॉ. शशिकांत मढवी, तालुका वैद्यकीय अधिकारी, सुधागड

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply