तळोजा : सिडकोतर्फे तळोजे फेज-1मधील सेक्टर 2, 9 आणि 10 येथे नवीन उद्याने तयार करण्यात आली आहेत. या उद्यानांचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) करण्यात आले. या समारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर-तळोजा मंडल उपाध्यक्ष निर्दोष केणी, विनोद घरत, आशा बोरसे, कृष्णा पाटील, नंदू म्हात्रे, सुरज पोरजी, दिनेश केणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Check Also
चित्रपट स्टूडिओतील मिनी थिएटर्स… एक वेगळं विश्व
आज मी जेव्हा परेल येथील राजकमल कला मंदिर स्टुडिओत जातो, तेव्हा अनेक गोष्टीसह तेथील मिनी …
RamPrahar – The Panvel Daily Paper