Breaking News

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त जासई विद्यालयात अभिवादन

उरण : वार्ताहर

रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख, पर्यवेक्षक साळुंखे, एस. एस. पाटील, एन. पी. पाटील, एस. सी. पाटील, अतुल पाटील, एस. बी. गाताडी तसेच विद्यालयातील सेवक वर्ग उपस्थित होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply