Breaking News

मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडी

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी परीसरातील मोहोपाडा येथून संकष्टी चतुर्थी निमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले. या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती.

संकष्टी चतुर्थीनिमित्त रसायनी परीसरातील वारकरी संप्रदायाने डोंगरी आलीतून पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली. हि पायी दिंडी मोहोपाडा श्री गणेश मंदिराजवळ येताच हभप मारुती खाने यांच्याहस्ते मंदीरातील श्रीगणेशास पुष्पहार घालून पायी दिंडी मोहोपाडा मार्गे पुढे निघाली. या वेळी ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिक दर्शंन घेतानाचे दिसून आले. टाळ मृदुंगावर श्री गणेशाचा जयघोष करीत भगवा झेंडा फडकत दिंडी रस्त्याच्या एका बाजूने शिस्तबद्ध पद्धतीने वरदविनायक महडच्या दिशेने मार्गस्थ झाली. या पायी दिंडीत लहान थोरांसह महिला वर्ग श्री गणेशाच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे पहावयास मिळाले.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply