पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपची कामे तळागाळात पोहचविण्याकरिता बूथ कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने बूथ संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजप कामोठे मंडलची बैठक भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. कामोठे येथे भाजपच्या बुथ संपर्क अभियानाच्या बैठकीवेळी जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख रमेश मुंडे, मंडल अध्यक्ष रवी जोशी, ओबीसी जिल्हा सरचिटणीस राजेश गायकर, सरचिटणीस भाष्कर दांडेकर, सर्व सन्माननीय नगरसेवक, मोर्चा, सेल व आघाड्यांचे अध्यक्ष, सरचिटणीस, संयोजक व सहसंयोजक, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.