Breaking News

‘गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यव्यापी दुर्ग महासंघ’

कोल्हापूर ः प्रतिनिधी
राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी दुर्गप्रेमी संस्थांचा राज्यव्यापी दुर्ग महासंघ स्थापन करण्यात येत आहे, अशी घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. 11) येथे केली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या 50व्या जन्मदिवसानिमित्त दुसर्‍या दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, दुर्ग महासंघाचे काम हे राजकारणविरहीत असेल. या कामात मी राजकारण करतोय असे वाटले तर मलाही बाजूला करा. दुर्ग महासंघाच्या वतीने केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी सामंजस्य करार करावा लागेल. त्यातून 10 किल्ल्यांच्या जतन, संवर्धनाचे काम पहिल्या टप्प्यात सुरू करता येईल, असे म्हणत त्यांनी कामाची रूपरेखा स्पष्ट केली.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply