नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा व टीमसीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. 11) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत 130पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी हत्या केली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप त्यांनी टीएमसीवर या वेळी केला.
जर बंगालमध्ये जय श्रीराम म्हणणार नाही, तर मग काय पाकिस्तानात म्हणणार का, असा सवालही अमित शाह यांनी टीएमसीला उद्देशून उपस्थित केला. निवडणूक संपेपर्यंत ममता बॅनर्जीही जय श्रीराम म्हणतील. केवळ एका विशिष्ट वर्गाची मते मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी असे करीत आहेत. भाजपचे सरकार सत्तेवर येताच एका आठवड्यात बंगालमध्ये आयुष्मान योजना लागू केली जाईल. ममता बॅनर्जी मे महिन्यानंतर केंद्राच्या योजना लागू होण्यापासून रोखू शकणार नाहीत, असा टोलाही शहा यांनी लगावला.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …