Breaking News

न्हावेखाडी येथे श्री गणेश जयंती उत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट न्हावेखाडी (मधला पाडा) च्या वतीने श्री गणेश जयंती साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी (दि. 15) न्हावेखाडी, मधला पाडा येथे हा उत्सव होणार आहे. या उत्सवाचे हे 22वे वर्ष आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक कान्हाशेठ ठाकूर, सुधीरशेठ कटेकर,  वाशी साई डेव्हलपर्स विजय कडू आदी उपस्थित राहणार आहे.

सकाळी 7 वाजता श्रींचे पुजन, दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाप्रसाद त्यानंतर रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत श्रींची मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहे.

बाप्पाच्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक ट्रस्टचे सल्लागार सावळाराम मोकल, राम मोकल, सी. एल. ठाकूर, अध्यक्ष नरेश मोकल, उपाध्यक्ष दिगंबर तांडेल, सचिन मोकल, सरचिटणीस नारायण घरत, चिटणीस सुभाष कडू, खजिनदार कृष्णा मोकल, अशोक मोकल तसेच ग्रामस्थ मंडळ न्हावेखाडी (मधला पाडा), श्री गणेश महिला मंडळ यांनी केले आहे.

Check Also

अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …

Leave a Reply