नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने उजळला आहे.
लक्ष्मी वसाहत येथील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पूर्वी छोट्या लाइट होत्या. त्यामुळे पुतळा अंधारमय वाटत होता. येथील स्थानिक रहिवाश्यांनी नगरसेवक राजू सोनी यांना फोन केला व त्यांना याबाबत माहिती दिली. तातडीने ते त्या ठिकाणी आले व त्यांनी त्यांची सुत्रे हलविण्यास सुरूवात केली. पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे पाठपुरावा करून त्वरित नवीन हायमास्ट येथे उभारण्यात आला. यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एकदम उजळला. याबाबत परिसरातील नागरिकांनी सोनी यांना धन्यवाद दिले.