पनवेल ः रामप्रहर वृत्त
शेकापचे खेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच काशिनाथ नामा गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. 26) भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. काशिनाथ नामा गोंधळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद आणखीन वाढणार आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बंडूशेठ गोंधळी, खेरणे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गोंधळी, चंद्रकांत गोंधळी, तालुका युवा चिटणीस शैलेश माळी, खैरणे बूथ अध्यक्ष रूपेश म्हात्रे, वावंजे पंचायत समिती अध्यक्ष प्रकाश खैरे, निलेश गोंधळी, मधुकर गोंधळी, महेश माळी, मच्छींद्र पाटील, गणपत मढवी, प्रदीप गोंधळी, अंकुश पाटील, कैलास मढवी आदी उपस्थित होते.
Check Also
यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा
यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …
RamPrahar – The Panvel Daily Paper