Breaking News

किंग कोहलीची मैदानाबाहेरही ‘विराट’ कामगिरी

10 कोटी इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणारा ठरला पहिला क्रिकेटर

मुंबई : प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. या वेळी हा रेकॉर्ड मैदानावर नाही तर मैदानाबाहेरचा आहे. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटी झाली असून, अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय आणि विशेष म्हणजे जगातील पहिलाच क्रिकेटर ठरला आहे, तर जगभरातील खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आला आहे.
जगभरातील सर्वाधिक कमाई करणार्‍या 10 क्रिकेटर्समध्ये इन्स्टाग्रामवर प्रायोजित पोस्टच्या माध्यमातून कमाई करणारा विराट कोहली एकमेव क्रिकेटर आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स रोनाल्डोच्या नावे आहेत. रोनाल्डोचे 26.5 कोटी फॉलोअर्स आहेत, तर मेस्सी 18.6 कोटी आणि नेमार ज्युनिअर 14.7 कोटी फॉलोअर्सहित दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहेत.
विराट कोहलीचा खूप मोठा चाहतावर्ग असून सोशल मीडियावरही त्याला मोठ्या प्रमाणात फॉलो केले जाते.  कोहलीने प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, दीपिका यांनाही इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या यादीत मागे टाकले आहे. इतकेच नाही तर तो सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असणारा सेलिब्रेटीदेखील आहे.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply