Breaking News

जागतिक सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

तळोजा ः प्रतिनिधी

येथील दीपक नायट्राइट लि. कंपनीत सर्व कामगारांच्या उपस्थितीत 4 ते 10 मार्चदरम्यान साजरा होत असलेल्या जागतिक सुरक्षा सप्ताहाचे थाटामाटात उद्घाटन झाले. या वेळी एमआयडीसी फायर ऑफीसर दीपक डारुगडे यांच्या हस्ते सुरक्षा साहित्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सुरक्षा साहित्यांचे प्रदर्शन पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.

कार्यक्रमात साइट हेड अविनाश परांजपे यांच्या हस्ते सुरक्षा ध्वजारोहण करण्यात आले, तर कंपनीचे मुख्य सुरक्षा अधिकारी गजानन देशपांडे यांनी सुरक्षा दिनाचे महत्त्व सांगितले, तसेच सर्व कर्मचार्‍यांनी सुरक्षित काम करण्याची सामूहिक सुरक्षा प्रतिज्ञाही या वेळी घेतली. कार्यक्रमाला कंपनीचे प्रमुख अधिकारी विकास वाकडे, भारत सकपाळ, आनंद मोहन तसेच सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply