स्पेन : वृत्तसंस्था
सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणार्या एमसी मेरी कोमला संघर्षपूर्ण उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागल्याने बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या 37 वर्षीय मेरीला अमेरिकेच्या विर्जिनिया फच्स हिने हरवले. दोघींनी तोडीस तोड खेळ केल्यानंतर पंचांनी फच्सच्या बाजूने कौल दिला.
पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध पवित्रा बाळगला, पण दुसर्या फेरीत मेरीने अधिक आक्रमक खेळ केला. तिसर्या आणि अंतिम फेरीत दोन्ही खेळाडूंनी एकमेकींना ठोसे लगावले, मात्र मेरीला अधिक ठोसे मारल्यामुळे पंचांनी फच्स हिला विजयी घोषित केले.
तत्पूर्वी, सतीश कुमार (91 किलोवरील) आणि आशीष कुमार (75 किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली. सतीशने डेन्मार्कच्या गिवस्कोव्ह नील्सनला 5-0 असे, तर आशीषने इटलीच्या रेमो सल्वातीला 4-1 असे पराभूत केले.
सिमरनजित कौर (60 किलो) तसेच जास्मिन (57 किलो) आणि पूजा राणी (75 किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. जास्मिनने इटलीच्या सिरिन चाराबी हिला, तर सिमरनजितने प्यूएटरे रिकोच्या किरिया तापिया हिला हरवले. पूजाने पनामाच्या अथेयना बायलॉन हिच्यावर वर्चस्व गाजवले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper