Breaking News

नवी मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थांचा लाखोंचा साठा जप्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अमली पदार्थांची विक्री करण्यार्‍या दोघांना नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रुपये पाच लाख किमतीचे ब्राऊन शुगर नामक अंमली पदार्थ त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.

वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सलीम रहमान इनामदार यांना 11 मार्च रोजी सुत्रांकडून वाशी सेक्टर 10 येथील श्रद्धा इमारती जवळ काही लोक अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याचे समजले. इनामदार यांनी सदर बाब आपल्या वरिष्ठांना सांगितली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सापळा रचला.

अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा बी जी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांच्या टीमने या परिसरात सापळा रचला त्यावेळी येथे 2 व्यक्ती संशयास्पद आढळून आल्या त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे ब्राऊन शुगर नामक अमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत जवळपास पाच लाख असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरोपींवर गुन्हा दाखल

आरोपींकडून होंडा अ‍ॅक्टिव्हा ही दुचाकीही हस्तगत करण्यात आली सर्व मुद्देमालाची किंमत साडेसहा लाख आहे. या दोन्ही आरोपींना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांवर मानवी आरोग्यावर परिणाम करणारे पदार्थ एनडीपीएस अधिनियम 1985 कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून हे आरोपी सदर ब्राऊन शुगर कोणाला विकण्यास आले होते. त्याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply