Breaking News

उरणचा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवा

आमदार महेश बालदी यांची शासनाकडे मागणी

उरण ः वार्ताहर
उरण शहर तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध नसल्याने दरदिवशी गोळा होणारा सुका व ओला कचरा टाकणार कुठे अशी समस्या निर्माण होत आहे. राज्य शासनाने डम्पिंग ग्राऊंडसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली आहे.
आमदार महेश बालदी यांना उरण पालिका तसेच परिसरातील ग्रामपंचायत हद्दीत दरदिवशी गोळा होणार्‍या ओल्या व सुक्या कचर्‍याच्या समस्येबद्दल माहिती देताना सांगितले की, उरण पालिकेला कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा आजतागायत उपलब्ध झालेली नाही. शासनाने पुनाडे ग्रामपंचायत हद्दीत पालिकेसाठी कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंड जागा दिली, परंतु तेथील रहिवाशांनी विरोध दर्शविल्याने जागेचा तिढा सुटलेला नाही. वाढते औद्योगिकरण, नागरीकरणामुळे उरण शहरात दर दिवशी मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा गोळा होत आहे. हा कचरा टाकणार कुठे, असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण होत आहे.
आमदार महेश बालदी पुढे म्हणाले की, उरण तालुक्यातील सिडकोबाधित ग्रामपंचायतींना डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा ठिकठिकाणी दिली आहे, असे सिडकोनेच सूचित केले असले तरी प्रत्यक्षात ताबा न मिळाल्याने त्याही ग्रामपंचायतींसमोर डम्पिंग ग्राऊंडचा ग्रहण प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील इतर ग्रामपंचायत हद्दीतही नागरीकरण झपाट्याने वाढत असून, ग्रामस्थ, स्थानिक ग्रामपंचायती या डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध नसल्याने दरदिवशी गोळा होणारा कचरा मिळेल त्या ठिकाणी टाकत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरत आहे. परिणामी शासन राबवित असलेल्या स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी या परिसराचा लोकसेवक म्हणून मी केली व करीत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply